सुतारवाडी नाक्यावर भटक्या कुत्र्यांची दहशत

| सुतारवाडी | वार्ताहर |

सुतारवाडी नाक्यावर भटक्या कुत्र्यांचा घोळका सातत्याने फिरत असून, त्यामध्ये काही कुत्रे अत्यंत खराब झालेले आहेत. सुतारवाडी बसथांब्यावर सकाळी कॉलेजला जाणारे पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी असतात. भटक्या कुत्र्यांचा त्यांना त्रास होऊ शकतो. अनेक ठिकाणी या प्राण्यांनी मुलांना चावा घेऊन घायाळ केल्याच्या बातम्या ऐकावायस मिळत आहेत. हे कुत्रे जर चावले तर भयानक प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सुतारवाडी नाक्यावरून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत जाणारे विद्यार्थीसुद्धा आहेत. त्यांनासुद्धा इजा होऊ शकते. त्यामुळे या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

Exit mobile version