महिला पोलीस अधिकाऱ्याचीच पर्सची चोरी

| पनवेल | वार्ताहार |

पनवेल बाजारात किरकोळ खरेदीसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचीच पर्स चोरट्यांनी चोरून नेली आहे. मुंबई पोलिस दलात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या 33 वर्षीय सहायक महिला पोलिस निरीक्षक आपले कर्तव्य बजावून करंजाडे मधील घरी आल्यानंतर मार्केटमध्ये किरकोळ खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून पैसे देण्यासाठी गळ्यातील पर्स पाहिली असता चोरट्यांनी पर्समध्ये ओळखपत्र, रोख रकमेसह इतर साहित्य असलेली पर्स बेल्ट कापून चोरी केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version