| पाली/बेणसे | वार्ताहर |
जिल्ह्यामधील तळा- इंदापूर मार्गावर मुठवली गावाजवळ शनिवारी (दि.26) रात्री एका कारने भर रस्त्यात पेट घेतला. यावेळी कारचालक प्रसंगावधानता दाखवून बाहेर पडला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारमध्ये फक्त कार चालक होता. कारला कशामुळे आग लागली याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच ताबडतोब सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे बचाव पथक व अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. आग विझवल्यानंतर रस्त्यात असलेली कार सर्वांनी मिळून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.






