चौलमळा येथे रंगणार क्रिकेटचा थरार

रविवारी रवींद्र घरत, महेंद्र नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे रविवार, (दि. 7) एप्रिल रोजी चौलमळा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. चौलमळा क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच ही स्पर्धा चौल-पाझर येथील मैदानावर खेळविण्यात येणार आहे. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, हीच या स्पर्धेमागची भावना आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन गावप्रमुख रवींद्र घरत, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, भजन मंडळाचे अध्यक्ष तथा युवक मंडळ उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, भजन मंडळ उपाध्यक्ष अंजेश घरत, अन्य सहकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा चौलमळा गावापुरती मर्यादित असून, गावातील तरुणांचे सहा संघ सहभागी होणार आहेत.

आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाची मालकी देण्यात आली आहे. त्यात शैलेश नाईक संघमालक (काव्या चॅलेंजर्स), सुजित नाईक संघमालक (जित ट्रान्स्पोर्ट), मोहन घरत संघमालक (अलिबाग बीच कॅम्पिंग), सचिन आमरे संघमालक (रिया टायगर), मंदार नाईक संघमालक (श्री कृष्णादेवी प्रसन्न), सुनील घरत संघमालक (श्री माऊली केबल नेटवर्क) या संघांचा समावेश असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक चौलमळा क्रिकेट संघाचे अनिकेत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी मेहनत घेत आहेत. तरी, ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

असे असतील संघ
1) शैलेश नाईक (संघमालक) काव्या चॅलेंजर्सः- अनिकेत म्हात्रे (कर्णधार), सिद्धेश जाधव, सुजित म्हात्रे, अंजेश घरत, राजेंद्र पाटील, अमित पाटील, प्रीत नाईक, साहिल पराड, राजेंद्र नाईक, अल्पेश घरत.
 
2) सुजित नाईक (संघमालक) जित ट्रान्सपोर्टः- रवींद्र घरत (कर्णधार), चिन्मय घरत, आयुष मोरे, वेदांत लाड, अनिकेत नाईक, निलेश मोरे, अमित नाईक, वेदांत पाटील, जितेंद्र पाटील, संदीप घरत, ॠणित घरत.
 
3) मोहन घरत (संघमालक) अलिबाग बीच कॅम्पिंगः- मोहन घरत (कर्णधार), प्रणव पाटील, साक्षात म्हात्रे, महेंद्र नाईक, विराज लाड, दीपक लाड, बाळकृष्ण पाटील, अल्पेश म्हात्रे, महेश पाटील, रवींद्र ह. घरत.
 
4) सचिन आमरे (संघमालक) रिया टायगर्सः- साईप्रसाद पडवळ (कर्णधार), अभिषेक घरत, ओमकार पाटील, रोहित खैरे, हार्दिक नाईक, राकेश लोहार, विनित सातांबेकर, महेश घरत, तुषार पाटील, महेंद्र घरत.
 
5) मंदार नाईक (संघमालक) श्री कृष्णादेवी प्रसन्नः- जितेंद्र नाईक (कर्णधार), मनीष नाईक, जितेंद्र जाधव, विशाल घरत, पार्थ घरत, मंदार नाईक, सर्वेश पाटील, संकल्प म्हात्रे, प्रज्वल पडते, अद्विक नाईक, ईशान मुकादम.
 
6) सुनील घरत (संघमालक) श्री माऊली केबल नेटवर्कः- जयेंद्र म्हात्रे (कर्णधार), मिलिंद मनोरे, सार्थक घरत, ओम आमरे, कश्यप वाडकर, प्रशांत आमरे, जितेंद्र घरत, विघ्नेश म्हात्रे, कुणाल नाईक, अमोल घरत.
Exit mobile version