जानेवारीत एनएमपीएलचा थरार

अडीचशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

अल्पावधीत महाराष्ट्रासह देशात लोकप्रिय ठरलेल्या नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएल स्पर्धेचा शुभारंभ गुरुवारी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संदीप नाईक यांच्या हस्ते वाशी येथे आय लिफ हॉटेलमध्ये नेत्रदीपक समारंभात करण्यात आला. दि. 17 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर या लीगमधील खेळाचा थरार नवी मुंबईकर क्रीडा रसिकांना अनुभवता येणार आहे.

नवी मुंबई शहराला एकत्र करणारी अशी ही स्पर्धा आहे. 40 प्लस खेळ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन एनएमपीएल सुरू केल्याचे संदीप नाईक म्हणाले. यावर्षी ‌‘हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई’ ही थीम घेण्यात आली आहे. नवी मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रीमियर लीगची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. यावर्षी सोळा मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला असून, 240 क्रिकेटपटूंचा दर्जेदार खेळ पहावयास मिळणार आहे.

एनएमपीएलच्या शुभारंभप्रसंगी माजी नगरसेवक लीलाधर नाईक, एनएमपीएल कमिशनर दीपक पाटील, स्वप्निल नाईक, ओमकार नाईक, निलेश पाटील, प्रतीक पाटील, माजिद बलोच, महेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुनंदा कोळी शाबाजकर, बाबू सुतार, विकी भोईर, भूषण पाटील, समालोचक कुणाल दाते, विघ्नेश मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version