बैलगाडी शर्यतीचा थरार

अमोल कोतवाल प्रथम क्रमांकाचे मानकरी

| आगरदांडा | प्रतिनिधी |


बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर गेले दहा वर्षांनी मुरुड समुद्रकिनार्‍यावर हिंदू नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर शिवसेना मुरुड शहर शाखेच्या वतीने घोडागाडी, सायकल, घोडेस्वार व बैलगाडी शर्यतीचा थरार शौकिनांना अनुभवता आला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी मुरुड-नांदगाव अमोल कोतवाल, द्वितीय मुरुड काशिद परवेश बेलोसे, तृतीय क्रमांक अलिबाग-किहीमच्या वामन पडवळ यांनी पटकाविला. या स्पर्धेकरिता जिल्ह्यासह तालुक्यातून दहा सायकलस्वार, सहा घोडेस्वार, दहा घोडागाडी व 80 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदविला.

Exit mobile version