आक्षी समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर-रायवाडी हौशी मित्रमंडळ आयोजित आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील पुरस्कृत बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत नागाव येथील बदामी ते रायवाडी-आक्षी समुद्रकिनारी मंगळवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार (दि.23) चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, अश्लेषा नाईक, सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, नागावचे सदस्य निखील मयेकर, अनिरुध्द राणे, सुनील नाईक, आक्षी ग्रामपंचायत सदस्य निरजा नाईक, रश्मी वाळंज, विनायक पाटील, उलेश नाखवा, रश्मीन गुरव, डॉ. रविंद्र पाटील, नागेश्वरी हेमाडे आदी मान्यवर, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच बैलगाडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य बैलगाडी प्रेमी व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला.

यात आठ गटांचा समावेश होता. या गटातील प्रत्येक प्रथम ते तृतीय क्रमांकाला सायकर, मिक्सर व कुलर देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील पहिल्या क्रमांकाचे रेफ्रीजरेटर बक्षीस कै.श्रीनिवास भगत, दुसऱ्या क्रमांकाचे वॉशिंग मशीन दिवेकर बंधू, तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्मार्ट टिव्ही ही मनोहर ठाकूर यांना देण्यात आली.

सायकल –1) वेदश्रि पाटील-पेण, 2) चेतन नेमन-गोंधळपाडा, 3) प्रांजल पाटील-मुळे.

घोडागाडी एक्का– 1) नरेंद्र वाडेंं-सारळ, 2) नागेश बळी-थेरोंडा, 3) दिनेश माळी-गोंधळपाडा.

घोडागाडी दुक्का- 1) शिवदास भगत-अलिबाग, 2) किरण खडेराव-थेरोंडा, 3) सुरज पाटील-बेली

बैलगाडी गट 1– 1) संतोष गुरव-नागांव, 2) विनायक पाटील-आक्षी, 3) अनिकेत पाटील- नागांव

बैलगाडी गट 2- 1सचिन राऊळ- नागांव, 2 सिद्धेश वेळे-खंडाळे, 3 सारा पाटील- कुरुळ.

बैलगाडी गट 3 अ- 1) नश ठोंबरे-मिळखतखार, 2) रवींद्र म्हात्रे-खारगल्ली 3) हर्ष तिवळेकर-थेरोंडा.

बैलगाडी गट 3 ब- 1) निष्ठा पाटील-थळ, 2) रुद्रा राणे-नागांव, 3) श्रियांश खेडेकर-चिकनी.

बैलगाडी गट 4- 1) गिरीश म्हात्रे-आगारसुरे, 2) जाकमाता ग्रुप-परहुरपाडा 3) मधुकर पाटील-चोरगुंडी.

बैलगाडी फ्री कॉटर फायनल- 1) पुंडलिक संसारे- झिराड, 2) प्रसाद म्हात्रे-सासवणे, 3) लक्ष्मन म्हात्रे-आवास.

बैलगाडी कॉटर फायनल- 1) विनायक चव्हाण-भायमाला, 2) सर्वेश दिवेकर-बारशिव, 3) प्रसाद दवते-वरसोली.

बैलगाडी सेमी फायनल– 1) सुधाकर म्हात्रे-म्हात्रोली, 2) पद्माकर मयेकर-चाळमळा, 3) अमृत वाकडे- सासवणे.

बैलगाडी कॉटर फायनल– 1) विनायक चव्हाण-भायमला. 2) सर्वेश दिवेकर-बारशिव, 3) प्रसाद दवते-वरसोली.

‌‘तेजा’च्या यशाला ‌‘सोन्या’ची झळाळी
अलिबाग तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात बैलगाडी क्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, असे चौलमळा गावचं बैलांचे प्रसिद्ध व्यापारी अशोक पाटील यांच्या तेजा-सोन्या या बैलजोडीने आजच्या शर्यतीत चौथ्या गटात प्रथम क्रमांक क्रमांचे पारितोषिक पटकावलं. या यशाबद्दल बैलगाडी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version