नेहूलीत रंगला कुस्तीचा थरार

अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील श्री बहिरेश्‍वर मित्र मंडळ, शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत तसेच इंडिया आघाडीच्या सहकार्याने कुस्ती स्पर्धा सोमवारी (दि.16) भरविण्यात आली. नेहूली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात स्पर्धेचा थरार पहावयास मिळाला. शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटातील युवासेना रायगड जिल्हा प्रमुख पिंट्या ठाकूर, शेकापचे युवा नेते सवाई पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश पाटील, खंडाळेचे सरपंच नासिकेत कावजी, रायगड जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत, खंडाळेचे माजी सदस्य नरेश गोंधळी, विनोद पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष गंधर्व पाटील, मंडळाचे अध्यक्ष विजय थळे, उपाध्यक्ष प्रभाकर सदू पाटील, विलास वालेकर, अशोक पाटीलर, संतोष पाटील, शशीकांत पाटील, महेश घरत, नितीन पाटील, उल्हास पाटील, मंगेश मढवी, निवास घरत, किरण पाटील, अशोक घरत, नामदेव पाटील, राजीव पाटील, रामदास कावजी, प्रमोद भगत, कृष्णा पाटील, यशवंत पाटील, बाळकृष्ण पाटील आदी मान्यवरांसह वेगवेगळया क्षेत्रातील पदाधिकारी, पंच, कुस्ती प्रेमी, खेळाडू, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून श्री बहिरेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेची परंपराज जपली जात आहे. याही वर्षी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नेहूली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात दुपारी एक वाजल्यापासून मल्लांची गर्दी होऊ लागली. बोलता बोलता दुपारी अडीच वाजेपर्यंत मल्लांसह कुस्ती प्रेमींनी परिसर फुलून गेला. अलिबाग तालुक्यातील आंदोशी, वाडगांव, मांडवा, आवास आदी गांवासह पेण, पनवेल तालुक्यातील असंख्य आखाड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेसाठी सुमारे दीडशेहून अधिक मल्लांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नारळ वाढवून दुपारी तीननंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उद्घाटनीय कुस्ती स्पर्धा वाडगाव येथील जय भगत आणि मांडवा येथील अभिलेश पाटील यांच्यामध्ये झाली. दोन्ही मल्ल जिंकण्याच्या जिद्दीने लढत होते. अखेर हा सामना समान झाला. यावेळी पंच म्हणून अंकूर घरत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर आंदोशी येथील मल्ल फैजाल अली आणि मांडवा येथील मल्ल स्वागत पोटे यांच्यामध्ये कुस्तीचा सामना झाला. त्यात फैजाल अलीने पोटे या मल्लाचा पराभव करून विजय संपादन केले. या विजेत्या मल्लाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version