तिबेटी खंड्या आता रायगडचा खंड्या

जागतिक पर्यटन दिनी घोषणा, विविध उपक्रमांचे अनावरण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याच्या बोधचिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्व आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान शासन राबवित आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाविन्यपूर्ण योजनेतून साकारलेल्या रायगड..वारसा इतिहासाचा..संस्कृतीचाअन् निसर्ग सौंदर्याचा या लघुचित्रफितीचे उद्घाटनही करण्यात आले.या लघुचित्रफितीमध्ये पर्यटकांना आकर्षिक करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील सुप्रसिध्द गडकिल्ले, स्मारके, समुद्रकिनारे यांचे चित्रीकरण प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कर्नाळा अभयारण्यातील तिबेटी खंड्या या पक्ष्याची रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. यानंतर शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्वाकांक्षी अभियानानिमित्त प्रबोधन, प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत माहिती पत्रिकेचे अनावरण पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या माहितीपत्रिकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ई-पीक पाहणीद्वारे शेतकर्‍यांना मोबाईल पद्वारे त्यांचा पीकपेरा सातबार्‍यावर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यावेळी जि.प.अध्यक्ष योगिता पारधी, खा.सुनिल तटकरे, खा.श्रीरंग बारणे, सर्वश्री आ.बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, माजी आमदार सुरेश लाड, ंअ‍ॅड. आस्वाद पाटील, प्रियदर्शनी पाटील, बबन चाचले, गीता जाधव, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

रुग्णवाहिकांचे लोकार्पण
चिखली, पेंढाबे, आपटा, गव्हाण, कडाव, नागोठणे, इंदापूर, खालापूर, तळा, विन्हेरे, वरंध, बिरवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी शासनाकडून दुसर्‍या टप्प्यात प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Exit mobile version