लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवरायांची नाहीत?

इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून केलेल्या पत्रव्यवहारात, लंडन येथून आणणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने लंडनमधील वाघनखे परत आणण्याचा दावा केला होता. मात्र, म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने जनतेची दिशाभूल करू नये, असे मत इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले आहे.

लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका. त्यांनी ही वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्याचे लिहणे बंधनकारक केले असताना, राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत. लंडनमध्ये सहा वाघनखे आहेत आणि त्यापैकी एक आणून फसवणूक केली जात आहे. अस्सल वाघनखे ही सातारा येथेच आहेत. प्रतापसिंह महाराज यांनी लंडनमध्ये वाघनखे दिल्याची माहिती हे त्यांच्या चरित्राचे हनन करण्यासाठी दिली जात आहे. सरकारने ताबडतोड यावर स्पष्टीकरण द्यावे. सातारा राजघराण्याकडे ही वाघनखे आहेत आणि ते घराणे कधीतरी स्पष्टीकरण देतील. शेवटी, उदयनराजे यांनीच आता पुढे येऊन याची माहिती द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Exit mobile version