बसच्या टायरला लागली आग

। पनवेल । वार्ताहर ।
एका लक्झरी बसच्या टायरला अचानकपणे आग लागली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. खारघर टोल नाका येथे गोव्यावरून शुक्रवारी (दि.24) सकाळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लक्झरी बसच्या टायरला अचानकपणे भीषण आग लागल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु खारघर टोल नाकाच्या कर्मचार्‍यांनी कळंबोलीच्या अग्निशमन दलाला याबाबत कळविले व अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचून त्यांनी सदरची आग आटोक्यात आणली.

Exit mobile version