मुंबईकरांची पर्यटनवारी, उमेदवारांना पडली भारी

राज्यात फक्त 48 टक्के मतदान, देशाचाही टक्का घसरला

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान पार पडले. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा होता. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदारांनी आपला हक्क बजावला. अन्य चार टप्प्यांची आकडेवारी पाहता राज्यातपाचव्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत कमालीची घट झाल्याचे दिसून आले. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर केल्यामुळे मुंबईकरांनी शुक्रवारी सायंकाळीच पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळविला. मतदान करण्याच्या आवाहनांकडे पाठ फिरवून आठवड्याच्या पिकनिकचे बेत आखण्यात आले. पर्यटनस्थळांमध्ये बुकिंग फुल झाले. त्यामुळे मुंबई भागातील अनेक ठिकाणच्या टक्क्यांमध्से घट झाली.
महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, ओडिशातील 5, जम्मू-काश्मीरमधील 1 आणि लडाखमधील 1 जागा आहे. विशेष म्हणजे, सात टप्प्यांत होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. राज्यातील अनेक भागात काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तसेच ईव्हीएम मशिन बंद असल्याचा प्रकारही समोर आल्याचे आरोप करण्यात आले.

महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढती
मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) वर्षा गायकवाड (काँग्रेस) मधून निवडणूक लढवत आहेत.

मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यामिनी जाधव (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) यांची अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.

मुंबई उत्तर-पश्‍चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे गट) मिहीर कोटेचा (भाजप) येथून निवडणूक लढवत आहेत.

कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्या विरोधात डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.

ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) नरेश म्हस्के (शिवसेना) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.

भिवंडी : कपिल मोरेश्‍वर पाटील (भाजप) सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) कडून निवडणूक लढवत आहेत.

पालघर: हेमंत सवरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याशी लढत आहे.

धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) येथून शोभा दिनेश (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.

दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप) निवडणूक लढवत आहेत.

नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) हे राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून निवडणूक लढवत आहेत.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
भिवंडी- 48.89 टक्के
धुळे- 48.81 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
कल्याण 41.70 टक्के
मुंबई उत्तर 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्‍चिम 49.79 टक्के
मुंबई दक्षिण 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
नाशिक 51.16 टक्के
पालघर- 54.32 टक्के
ठाणे 45.38 टक्के
Exit mobile version