। सुतारवाडी । वर्ताहर ।
कोलाड मार्गाकडून विले भागांकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर हेटवणे नजीक जळून खाक झाला आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेमध्ये ट्रेलर रस्त्याच्या कडेला अडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली नाही. या घटनेमध्ये ट्रेलरजी चाके जळून खाक झाली आहेत. या परिसरामध्ये असेच अनेक प्रकार घडलेले आहेत. ट्रेलर चालवत असताना कानाला मोबाईल लावणे, बेफिकीरपणे ट्रेलर चालविणे यामुळे अनेक अपघात या परिसरात झालेले आहेत. याबाबत परिसरामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.