कामोठेतील हिरवळ हरवत चालली
। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे सिडको वसाहतीतील रस्त्याच्या दुभाजकावर सिडकोकडून झाडे लावण्यात आल्याने परिसर हिरवागार दिसायचा. मात्र, गेल्या महिन्यापासून दुभाजकावरील झाडे पाण्याविना सुकू लागली आहेत. सिडकोकडे पाण्यासाठी टँकर असूनदेखील या झाडांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सिडकोने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कामोठेकरांकडून केली जात आहे. सिडको वसाहतीतील रस्ते त्याचबरोबर अंतर्गत सुविधा सिडकोकडून पुरवल्या जातात. रस्त्यांचे डांबरीकरण करून दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी सिडकोकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. कामोठे शहर प्रवेशद्वार ते मानसरोवर स्टेशन रस्त्यावरील दुभाजकातील झाडे पाण्याविना सुकू लागली आहेत. झाडांना पाणी मिळत नसल्याने बहुतांश झाडे सुकली आहेत.







