नेरळमध्ये मध्यरात्री तिरंगा फडकणार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने भारताचा स्वातंत्र्यदिन मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी साजरा केला जाणार आहे. नेरळ येथील हुतात्मा चौकात भारतीय सेना दलातील निवृत कर्नल डॉ. कुशाग्र पटेल हे ध्वज फडकविणार आहेत.

नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी पहिल्या प्रहरी बारा वाजून एक मिनिटांनी तिरंगा फडकावून साजरा केला जाणार आहे. 2005 पासून नेरळ येथील कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील माथेरान नाका येथील हुतात्मा चौकात स्वातंत्र्यदिन मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी तिरंगा फडकावून आनंद साजरा केला जातो. यावर्षी भारतीय सेना दलातील निवृत कर्नल डॉ. कुशाग्र पटेल यांच्या हस्ते तिरंगा फडकला जाणार आहे. मध्यरात्री होणाऱ्या या कार्यक्रमात नेरळ परिसरातील माध्यमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो. यावर्षी नेरळ येथील एलएईएस शाळेच्या विद्यार्थिनी आर्या मिलिंद सुर्वे ही कर्जत तालुक्यात प्रथम आली. तिचा सत्कार या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी रात्री अकरा वाजता तिरंगा रॅली आणि मशाल फेरी काढली जाणार आहे. देशप्रेमी या रॅलीमध्ये सहभागी होऊन हुतात्मा चौक ते नेरळ-हुतात्मा चौक अशी दौड काढत असतात. या सोहळ्याला नेरळ गावातील रहिवासी, तरुण आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीने केले आहे.

Exit mobile version