ट्रक चालक व मालक उतरले रस्त्यावर

| पनवेल | वार्ताहर |

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक आज रस्त्यावर उतरले होते. व त्यांनी कळंबोली सर्कल परिसरातील मार्ग ठप्प केला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे. असा दावा करीत या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी सोमवार 1 जानेवारी रोजी कळंबोली सर्कल येथे जाणारा मार्ग रोखून आंदोलन छेडले होते.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या ठिकाणी आंदोलन केले असता सरकारला जाग येईल या उद्देशाने कळंबोली सर्कल येथे तेथील ट्रक चालक व मालकांनी रास्ता रोको करत आंदोलन छेडले व रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने सुद्धा त्यांनी थांबवली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी संतप्त ट्रक चालक व मालकांनी केंद्र सरकारच्या या नवीन कायद्याविरोधात घोषणा दिल्या.

Exit mobile version