। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रेक फेल होऊन झालेल्या ट्रकच्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
यातील ट्रक क्र. एमएच 10 सीआर 1866 यावरील चालक फक्रुद्दीन सिराज नदाफ (36), रा. तळसंदे हा मुंबई बाजूकडे जात असताना समोरून चालणारे कंटेनर ट्रेलरने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकवरील चालकाने ब्रेक मारला असता ब्रेक फेल झाला. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूच्या रेलिंगला धडक देऊन पलटी झाला. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही, परंतु, ट्रकचे नुकसान झालेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.