| चिरनेर | प्रतिनिधी |
गावो-गावच्या नाट्य मंडळांना, ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटतो. क्रीडा क्षेत्राबरोबरच गावोगावी नाट्य चळवळ उभी करण्यासाठी मी प्रयत्न करीत राहीन. नाट्य प्रेम हे घरातील तसेच नाट्य रसिकांच्या प्रेमामुळे वाढते. नाटककार हसूराम पाटील, अशोक म्हात्रे, धनेश्वर म्हात्रे या कलाकारांनी ग्रामीण कलाकारांना सोबत घेऊन नाट्यकलेचा जागर मांडला आहे. ही मंडळी करत असलेले काम अत्यंत स्तुत्य असे आहे. ग्रामीण नाट्य संस्कृती पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावागावात अभंग रहावी यासाठी मी प्रयत्न करत राहीन, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले.
उरण तालुक्यातील वेश्वी येथील मुंबईकर परिवाराच्यावतीने आणि अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ‘पैशाने तुटली नाती’ या दोन अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन गुरूवारी (दि.25) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच अजित पाटील, विलास पाटील, मुरलीधर ठाकूर, राजेश ठाकूर, संदीप पाटील, चंद्रकांत मुंबईकर, कृष्णा पाटील, महेंद्र मुंबईकर, सुहास मुंबईकर, विनायक मुंबईकर, विद्याधर मुंबईकर, अरविंद पाटील, विद्याधर म्हात्रे, प्रमोद पाटील, कैलासराजे घरत, दत्तात्रेय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.







