| पनवेल | प्रतिनिधी |
पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण मोटार सायकली वरून पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. पनवेल पदमवती सोसायटी येथे राहणाऱ्या श्रेयसी श्रीकांत कर्वे (67) या विघ्नेश मेडिकलसमोर स्वामी नित्यानंद मार्ग पनवेल येथून पायी जात होत्या. तेव्हा मोटार सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले व पसार झाले. हे मंगळसूत्र जवळपास 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे होते. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







