| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील हमरापूर गावात खासगी व्हिडीओवरून दोघींचे भांडण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील 32 वर्षीय पीडित महिला ही कुंभारआळी-हमरापूर येथील रहिवासी आहे. तर, खासगी व्हिडीओ प्रसिद्ध करणारी 21 वर्षीय महिला ही देखील हमरापूर येथील रहिवासी आहे. पीडित महिला ही उपरसरपंचपदासाठी निवडणूक लढत होती. त्यामध्ये ती निवडून देखील आली. मात्र, याबाबत तिच्या प्रतिस्पर्धी असलेल्या व्यक्तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्याचा राग मनात धरून पीडित महिलेचा खासगी व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यावरून दोघींमध्ये प्रचंड वाद झाले असून पीडित महिलेने दादर सागरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास दादर सागरी पेालीस निरिक्षक संजयकुमार ब्राम्हणे हे करत आहेत.
खासगी व्हिडीओवरून दोघींचे भांडण
