| पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने पिकअपला पाठीमागून धडक दिल्याने पिकअपचे नुकसान झाले. या प्रकरणी अरुण अंगरख याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण रामा दोरे हा कोंडीची वाडी येथे राहत असून डीजे साऊंड सिस्टिम साहित्य घेण्यासाठी पिकअप क्रमांक एम एच 46 बियू 4758 घेऊन निघाला. आकुर्ली ते पनवेल रस्त्यावर आदई सर्कल अंगण हॉटेलसमोर उतारावर रस्ता खोदून बुजवलेल्या ठिकाणी पिकअपचा ब्रेक लावला. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आर 15 मोटरसायकल क्रमांक एम एच 14 के आर 5935 वरील चालकाने पिकअपला पाठीमागून धडक दिली. यात पिकअपचे नुकसान झाले तर दुचाकीवरील दोन्ही ईसम जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे नेण्यात आले.






