बेशुद्ध पडलेल्या मुलीला जीवदान

रायगड हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 13 वर्षीय मुलीला बेशुद्ध अवस्थेत रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. कशेळे येथील अश्‍विनी अनिल पवार हिला मधुमेहाच्या समस्येने अनेक महिने ग्रासले होते.

ती मुलगी घरी बेशुद्ध होऊन पडली असता शेजार्‍यांच्या मदतीने त्यांच्या पालकांनी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयात तिला दाखल केले. तेथे अधीक्षक डॉ. हुब्बू जाधव यांनी तपासणी करून तात्काळ व्हेंटिलेटर लावण्याची सूचना केली. बालरोग तज्ज्ञ डॉ. ममता राजाध्यक्ष आणि डॉ. मीरा दांडगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्ण अश्‍विनी पवार हिला पुन्हा शुद्धीवर आणले.

रुग्णालयात दाखल केले त्यावेळी बेशुद्ध असलेल्या अश्‍विनीची शुगर पातळी 500 मिलिग्रॅम एवढी वाढली होती. रुग्णाला पुन्हा शुद्धीवर आणण्याचे आणि स्टेबल करण्याचे आव्हान रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजच्या आरोग्य पथकाने पेलल्याचे दिसून आले.

Exit mobile version