बेरोजगारांना मिळणार रोजगार

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची संधी चालुन आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी थेट निवड केली जाणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यातर्फे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारासाठी विविध खाजगी आस्थापनांवर नोकरीच्या संधी आहेत. यासाठी बुधवार 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात शिबीराचे आयोजन केले जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.

अलिबाग- चेंढरे येथील वैभव निवास, भांडार आळी येथे शिबीर (प्लेसमंट ड्राइव्ह) चे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग यांच्या जिल्हयातील विविध आस्थापनेवर विविध शाखेतील पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये वरीष्ठ अधिकारी- 4, कनिष्ठ अधिकारी- 8, व्यवस्थापक- 1 या पदासाठी तसेच रॅडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा, अलिबाग यांच्या आस्थापनेवर हॉटेल मॅनेजमेन्ट पदवी किंवा पदवीधर उमेदवारांना एफ ॲण्ड बी असिस्टंट- 5, फूड प्रोडक्शन ट्रेनी- 2, फ्रंट ऑफिस असिस्टंट- 1 या पदासाठी आणि क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन यांच्या आस्थापनेवर विविध शाखेतील पदवीधर किंवा एमएसडब्लु पात्र उमेदवारांना डीजीटल मार्केटिंग ट्रेनी- 15, ब्लॉक को-ऑर्डीनेटर- 15 अशा एकूण 51 पदांसाठी प्रत्यक्ष उमेदवारांची जागेवर निवड केली जाणार आहे.

Exit mobile version