रसायनी पोलिसांची कारवाई
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे.
यात बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेची दोन पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 200 लिटर रसायन मिळून आले.सदरील रसायन जागीच ओतून नाश करून नष्ट केले.व पत्र्याची टाकी तोडून नुकसान केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक अजिंक्य म्हात्रे, पोलिस नाईक नंदन पाटील आदींनी कारवाई केली.