| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पागोटे येथे 42वा हुतात्मा स्मृतिदिन शनिवारी (दि. 17) साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 1984 मध्ये केलेल्या शौर्यशाली, गौरवशाली आणि ऐतिहासिक लढ्यात उरण तालुक्यातील पागोटे गावातील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील, कमलाकर कृष्णा तांडेल हे नवघर फाटा येथे पोलिसांच्या बेछूट गोळीबारात हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानाप्रीत्यर्थ पागोटे येथे हुतात्मा दिन साजरा केला जातो.
यावेळी माजी आ. मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, दिबांचे पुत्र अतुल पाटील, कॉ. भूषण पाटील, रवी पाटील, संतोष पवार, कुणाल पाटील आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी रजनीकांत पाटील यांनी प्रास्ताविकात अपघाताचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी रुग्णवाहिका हवी, अशी मागणी केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका देण्याचे महेंद्रशेठ घरत यांनी जाहीर केले.
हुतात्म्यांच्या गावाला मिळणार रुग्णवाहिका
