युद्धामुळे भंगाराचे भाव वाढले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रशिया युक्रेनमधील युद्धाचा परिणाम थेट जिल्ह्यात जाणवत आहे. युद्ध सुरु झाल्यापासून लोखंडाचे भाव वाढले. परिणामी, भंगाराचे भाव वाढलेले आहेत. नुसते भंगारच नव्हे तर रद्दी, पुट्टा कार्टून, प्लास्टिक बाटल्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. एरव्ही, 25 ते 30 रुपये किलोने विक्री होणारे लोखंडी भंगार आजघडीला 35 ते 45 रुपये किलोदरम्यान विकले जात आहे.

जिल्ह्यात, शहरात व औद्योगिक परिसरात मिळून दररोज 300 टन भंगार जमा होते. यात केवळ 35 टक्के 13 ते भंगरावर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यात येते. बांधकामासाठी सळई तयार करण्याकरता लोखंड हैदराबाद येथील सळई उत्पादक कंपन्यांकडे पाठविले जाते.

महिनाभरापूर्वी 25 ते 30 रुपये किलोने भंगार खरेदी केले जात होते. मागील आठवडाभरासह भाववाढ होऊन 35 ते 45 रुपये किलोदरम्यान विकले जात आहे. भंगारात पहिल्यांदाच एवढी वाढ झाली आहे. – शकील मुकादम.

मागील दोन आठवड्यापासून पुठ्ठा व रद्दीचे भाव वाढले आहे. पेपररद्दी 26 ते 28 रुपये किलोदरम्यान खरेदी केली जात आहे. – रियास सय्यद.

का वाढले दर?
व्यापार्‍यांनी सांगितले की, युक्रेन हा मँगेनीज आणि लोहखनिजाचा मोठा निर्यातदार देश आहे. युद्धामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका भारतातील स्टील उद्योगांना बसला आहे. 3 जुने लोखंड (भंगार) खरेदी करून ते वितळवले जात आहे. त्यापासून सळई व अन्य साहित्य बनविले जात आहे.

Exit mobile version