रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरतर्फे ब्लँकेट वाटप
| अलिबाग | वार्ताहर |
गरिबीच्या झळा आणि पोटात भुकेच्या कळा सोसत अनेक निराधार कुटुंबे कडक्याच्या थंडीने गारठून गेली आहेत. अशा परिस्थितीत सामाहिजक बांधीलकी जपत रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरतर्फे थंडीत निराधार झोपणार्या कुटुंबाना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिली. थंडीपासून रस्त्यावरील निराधारांचे संरक्षण व्हावे, यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास अलिबागमधील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे देणगी स्वरूपात मदत करीत चांगला प्रतिसाद दिला. तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेते उदय टिकेकर यांनीसुद्धा मोलाची देणगी स्वरूपात मदत केली. ही संकल्पना रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरची रोट्रॅक्टर नेहारिका घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली तेजस पानकर, ओमकार घोसाळकर, हर्षवर्धन पाटील, गौरी चव्हाण, अनिकेत पाटील यांनी पूर्णत्वास नेली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
रस्त्यावर थंडीत कुडकुडणार्यांना मायेची ऊब
