खारेपाटातील पाणी प्रश्‍न मार्गी लावणार

अतुल म्हात्रे यांचे आश्‍वासन

। गडब । वार्ताहर ।

पेण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रचारार्थ पेण तालुक्यातील खारेपाट वाशी विभागात अतुल म्हात्रे यांनी विभागातल्या बहुतांशी गावांना भेटी देत येथील प्रत्येक गावात जाऊन विविध समस्या जाणून घेतल्या.

गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजूनदेखील इथला पाण्याचा प्रश्‍न सोडवलेला नाही. पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्‍न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्‍न मुळापासून सोडवणार आहे. पण त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहेत या रोजगाराच्या समस्येवरती आपण काम करणार आहे. या विभागात वाड्या वस्त्या ज्या इथल्या आहेत गावांपासून दूर आहे शेतावरती घर आहेत इथे अजूनदेखील गाडी पोहोचत नाही अजूनदेखील रस्ते झाले नाही पाण्याची कुठली सुविधा नाही. तसेच, येथील जनता वर्षभर पागोळी विहिरीतलं पाणी पितात या ज्या काही समस्या आहेत या समस्यावर कायमचा तोडगा काढून येथील परीसर सुजलाम सुफलाम करणार आसल्याचे अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पेण तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष अशोक मोकल, सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत आदि उपस्थित होते.

Exit mobile version