पाणीप्रश्‍न लागला मार्गी

पौध येथील विहिरीचे भूमीपूजन

| पाताळगंगा | वार्ताहर |

उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाणीप्रश्‍न गंभीर होत आहे. अनेक गाव-वाड्यांवरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, खालापूर तालुक्यातील आंबिवली पाणीप्रश्‍न कायमचा मार्गी लागणार असून, त्यासाठी मजगाव ग्रामपंचायत सरपंच गोपानाथ जाधव यांच्या पुढाकारातून पाताळगंगा नदीच्या किनारी पौध येथे विहीर खोदण्यात आली आहे. त्या विहिरीचे भूमीपूजन येथील महिलांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

आंबिवली गावामध्ये नळ योजना आहे. मात्र, उन्हाळ्यामध्ये अनेक सरोवर तळ गाठत असतात. त्यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी वणवण लागते. दरम्यान, महिलावर्गास मुबलक पाणी मिळावे या उद्दात विचारातून नदीच्या ठिकाणी विहीर खोदण्यात आली. या नदीच्या पाझर असल्याने ही विहीर काही तासात भरत असल्यामुळे पाण्याची टंचाई वर्षाच्या बारा महिने भासणार नाही.

या विहिरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरात लवकर मुबलक पाणी मिळणार आहे. या विहिरीच्या भूमीपूजन सोहळ्यास सरपंच जाधव, जनार्धन जाधव, माजी उपसरपंच जया जाधव, तसेच विहिरीचे ठेकेदारासमवेत सीआरपी महिला बचत गट अध्यक्ष कमल जाधव, वर्षा जाधव, शारदा जाधव, मनिषा जाधव, उषा जाधव, अंजली जाधव, प्रियंका जाधव, दिपीका जाधव, अपर्णा जाधव, मोनिका जाधव, मीना पाटील, अस्मिता पाटील, सीमा पाटील, जयश्री पाटील, लता भोईर, पुष्पा ठोंबरे, सुवर्णा जाधव उपस्थित होत्या.

Exit mobile version