विहिरींनी तळ गाठला; ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील कालवे झाले माळ रान पाणी नसल्याने झाडे झुडपं माती घनकचरा भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त ‘ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो’ हि म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातून हद्दपार झाल्याची चिन्ह दिसत आहेत. शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील दहा ते बारा वर्षापासून पुई, पुगांव, खांब वगळता नडवली चिल्हे देवकान्हे मालसई धामणसई निडीतर्फे अष्टमी तसेच आंबेवाड़ी किल्ला लांढर निवी भूवनेश्‍वर आशा गावांना पाणी नाही. कालव्याला पाणी नसल्याने नागरिकांना व पशू प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
देवकान्हे विभागीय शेतकरी वर्गाला मागील डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते. मात्र मे महिना उजाडला तरी पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे शेती सोडाच पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे.
2021/22 या करीता कोलाड पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी खांब देवकान्हे पाणी वापर संस्थांची हंगामा आढावा बैठक कोलाड़ पाठबंधार्‍याचे विभागाचे कार्यकारी अभियंता अधिकारी यांच्या उपस्थितीत व पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बामणे यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर महिन्यात देवकान्हे येथे संपन्न झाली. यावेळी पाठबंधार्‍याचे पदाधिकारी, तसेच पाणी वापर संस्थांचे धामणसई देवकान्हे चिल्हे खांब पुगाव पुई सह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आणि उपस्थित शेतकरी वर्गाला डिसेंबर महिन्यात पाणी मिळेल असे जाहीर केले होते. मात्र आजही नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सदरच्या बैठकीत गेली अनेक वर्षे कालव्याची साफसफाई व दुरुस्ती करून शेतकर्‍यांना मुबलक पाणी देऊ मात्र यावर पाठबंधारे खाते कोणतीही दुरुस्ती अथवा सफाई करत नसल्याने पाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्यानी नाराजी व्यक्त करत या सिंचनावरील कुंडलिकेचा उजवा तीर व डावा तीर हे दोन्ही कालवे गेली दहा ते बारा वर्ष अर्धवट कामांमुळे कालवे पावसाळ्यात अधिक पाझरत असल्याने येथील शेतकर्‍यांचे झालेली नुकसान भरपाई पाठबंधारे विभागाने द्यावी अशी भूमिका घेत संपूर्ण कालव्याच्या बांधकामासाठी केलेला खर्चाचा बळीराज्याला त्याचा उपभोग मिळाला नाही. रोहा तालुक्यातील नडवळी, चिल्हे, देवकान्हे, मालसई, धामणसई, निडी अष्ठमी, आंबेवाड़ी ,किल्ला, धाटाव,वाशी ,लांढर, नीवी, या भागांतील बळीराजा अक्षरश उध्वस्त झाला आहे.

Exit mobile version