| चिरनेर | प्रतिनिधी |
जनसेवेतून आनंद देणाऱ्या वशेणी इतिहास संपादकीय मंडळातर्फे मंगळवारी (दि.6) संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील महिलांनी सहभाग घेत, मोदक स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला.
या अनुषंगाने गणरायाला आवडणाऱ्या 21 मोदकांचे उद्दिष्ट समोर ठेवून, स्पर्धेतील नियोजित 21 महिलांनी विविध रंगाचे, आकाराचे, नक्षीचे त्याचप्रमाणे पौष्टिक आणि चवदार असे आडवे, उभे मोदक बनविले होते. दरम्यान या स्पर्धेचे परीक्षण रवींद्र पाटील, शिक्षिका समता ठाकूर, संजीव पाटील, विजया भगत, शितल माळी या पाककलेत निपुण असणाऱ्या व्यक्तिमत्वांनी उत्तमरीत्या केले. स्पर्धेत अश्विनी ठाकूर (प्रथम) निकिता पाटील (द्वितीय) रूपाली पाटील (तृतीय) यांच्यासह उत्तेजनार्थ अक्षता पाटील, सुवर्णा म्हात्रे, सुचिता ठाकूर या महिला मोदक स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. याप्रसंगी अनंता माळी, क्रीडाप्रेमी शिक्षक सनी बोरसे, संजीव पाटील, डॉ. रवींद्र गावंड, दीपक म्हात्रे, अजय शिवकर, अनिता शिवकर, संदेश गावंड, बी.जे .म्हात्रे, अनंता तांडेल, गणपत ठाकूर, पुरुषोत्तम पाटील, अनंता पाटील, विश्वास म्हात्रे, किशोर म्हात्रे, गणेश खोत, बळीराम म्हात्रे, .जे.डी.पेंटर, आदी उपस्थित होते.






