। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन यंदाच्या दिवाळीनंतर घेतले जाईल, अशा हालचाली आहेत. नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्यात, 22 नोव्हेंबरच्या आसपास सुरू होणारे हे अधिवेशन 15 डिसेंबरपर्यंत चालण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या संसद भवनातील हे अखेरचे हिवाळी अधिवेशन ठरावे व पुढील हिवाळ्यातील (2022) अधिवेशन नवीन भवनातच घेणार असा विडा मोदी सरकारने उचलला आहे.
अधिवेशनात मंजूर करण्यासाठी मांडल्या जाणार्या विधेयकांची तयारी सध्या विविध मंत्रालयात सुरू आहे. किमान 25 ते 27 विधेयके चर्चा करून मंजूर करण्यासाठी सरकारच्या वतीने आणली जाऊ शकतात, अशा हालचाली आहेत.