पावसाळी भूछत्र्यांची न्यारी दुनिया

| माणगाव | प्रतिनिधी |

पावसाळा सुरू झाला की रानमाळावर शेताच्या बांधावर, घराच्या पागोळी बाहेर लहान मोठ्या आकाराच्या छत्र्या म्हणजेच छत्र उगवलेले कवक हमखास दिसतात. त्यांना कुत्र्याची छत्री, आलंबे, अळंबी, अलिंब अशा विविध नावाने ओळखले जाते. दिसायला आकर्षक व छत्रीच्या आकारासारखी पांढरे शुभ्र, काळसर असणारी, जाळीदार छत्री सारखी गदेच्या आकाराचे तर काही काड्यासारखी जाळीदार असतात.

यापैकी काही भूछत्रे खाण्यासाठी योग्य, काही औषधी तर बहुतांश विषारी असतात. यांचा व्यास साधारणपणे आठ सेंटीमीटर पेक्षा जास्त नसतो. भूछत्रांच्या जगात 2000 जाती असून त्यातील फारच थोड्या जातींची घरगुती अथवा व्यापारी प्रमाणावर लागवड होते. भूछत्र ही कवक असून कवकांच्या वरच्या स्तरातील कोणत्याही खाद्य अथवा अखाद्य मांसल कवकाला भूछत्र असे म्हणतात. कोकणात साधारणता आषाढ महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसानंतर पडणाऱ्या पावसात माळरानावर येणाऱ्या भूछत्रांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. आळंबी म्हणून ही भूछत्रे प्रसिद्ध आहेत. ग्रामीण, शहरी भागात या भूछत्रांना चांगली मागणी असून शंभर ते दोनशे रुपये वाट्याने ती विकली जातात.

Exit mobile version