आईबाबा फाऊंडेशनकडून समाजाला दिशा देण्याचे काम: डॉ. कालेल

| रसायनी | वार्ताहर |

आईबाबा फाऊंडेशन हे समाजातील गांजलेल्या लोकांसाठी करत असलेले समाजोपयोगी कार्य दिशा देणारे असून, प्रवीण नवरे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत, अशीच समाजसेवा कायम ठेवा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांनी केले आहे.

आई बाबा फाऊंडेशनचे प्रमुख प्रवीण नवरे यांनी आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण रूग्णालय यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामीण भागातील आसरेवाडी (चौक) येथे केले होते. त्याप्रसंगी डॉ. सविता कालेल बोलत होत्या. या शिबिरात मानसिक आजार बळावलेले रुग्ण जास्त प्रमाणात होते. या शिबिरात 230 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दंत चिकित्सा, त्वचा रोग, डोळे तपासणी, एचआयव्ही तपासणी, याचबरोबर रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब व मानसिक आजार यांची तपासणी केली. यावर मोफत औषध देण्यात आली. आहार, विचार यात सकारात्मक बदल कसा करावा, याची सविस्तर माहिती देण्यात आली, तर बदलत्या जीवनशैलीतील आपली जबाबदारी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. राजन यादव, डॉ. अशोक गीते, डॉ. सचिन सकपाळ यांच्यासह नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आई बाबा फाऊंडेशनच्या सर्व स्टाफ यांनी कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थितांचे आभार ओंकार सावंत यांनी मानले.

Exit mobile version