विश्‍वचषकाचं बिगुल वाजलं; यंदाचं यजमानपद भारताकडे

5 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा थरार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकदिवसीय विश्‍वचषकाचे यजमानपद भारताकडे असून, 5 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. या स्पर्धेबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. क्रिकबज या संकेतस्थळाच्या रिपोर्ट्सनुसार, 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला होणार आहे. तर विश्‍वचषकचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. विश्‍वचषकाची सेमीफायनल मुंबईत होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत चेपॉक स्टेडिअमवर होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. 2019 विश्‍वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये झाली होती. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. यंदाच्या विश्‍वचषकाची सुरुवात गतविजेते आणि उपविजेत्यांच्या सामन्याने होईल. विश्‍वचषकाची फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनला थरार रंगणार आहे. आयसीसी विश्‍वचषकाचे वेळापत्रक लवकच जारी करेल. आयपीएल संपल्यानंतर विश्‍वचषकाच्या तारखाची आणि वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते.

भारत-पाकिस्तान महामुकाबला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान भारताचा दौरा करण्यास तयार झाला असून, दोन संघाध्ये चेपॉक स्टेडिअमवर हायहोल्टेज सामना होण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर रोजी हा महामुकाबला होणार आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील हायहोल्टेज सामना अहमदाबादमध्ये रंगणार होता. पण पाकिस्तानने अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने हैदराबाद, चेन्नई आणि बंगलोर येथे होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याच तीन मैदानापैकी एका मैदानावर होण्याची शक्यता आहे.

भारताला इतिहासाच्या पुनरावृत्तीची संधी
टीम इंडियाला 2011 नंतर विश्‍वचषक जिंकता आलेला नाही. भारताने 2011 मध्ये घरच्या मैदानावर खेळलेल्या विश्‍वचषकाचे विजेतेपद पटकावलं होतं. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला 12 वर्षांनंतर या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. एकदिवसीय विश्‍वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. यात एकूण 10 संघ सहभागी होत असून, अंतिम फेरीसह एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने दोनदा विश्‍वचषक जिंकला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विजेतेपद पटकावलं होतं.

दहा संघांचा सहभाग
भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्‍वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आठ संघ पात्र ठरले आहेत. तसेच, दोन संघ पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत सामील होतील. विश्‍वचषकात 48 सामने रंगणार आहेत. प्रत्येक संघ 9-9 सामने खेळणार आहे. पात्रता फेरी खेळणार्‍या संघांमध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांचा समावेश असेल. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्‍वचषकात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना पात्रता सामने खेळायचे होते. मात्र, जेव्हा श्रीलंका पात्र ठरली होती आणि वेस्ट इंडिज बाहेर पडला होता. दोन स्थानासाठी 18 जून ते 9 जुलै यादरम्यान जिम्बाब्वेमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यजमान भारतास इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी थेट प्रवेश केला आहे.

Exit mobile version