भंगारवाल्यांनी नाल्यात टाकला बोटीचा सांगाडा

मनपा कर्मचार्‍यांच्या सर्तकतेमुळे टळली दुर्घटना
। पनवेल । वार्ताहर ।
मनपा कर्मचार्‍यांच्या सर्तकतेमुळे कळंबोली स्टील मार्केटमधील आगामी काळात होणारी दुर्घटना टळली आहे. स्टील मार्केटजवळील नाल्यात भंगारवाल्यांनी बोटीचा सांगाडा फेकून दिले असून ही बोट ब्रीजखाली अडकली होती. या दरम्यान जर पाऊस झाला असता तर मोठ्या प्रमाणत शहरामध्ये पाणी साचले असते, मात्र महापालिकेचे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे.
कळंबोली स्टील मार्केट जवळील एका नाल्यात भंगार वाल्यांनी बोटीचा सांगाडा फेकून दिले होते. ही बोट नाल्यालागून असलेल्या ब्रीज खाली अडकली होती. रायगड जिल्ह्यात सध्या पावसाचे अगमन कधीही होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान जर मुसळधार पाऊस झाला असता तर या नाल्यातील पाणी कळंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घुसले असते, मात्र महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्या सतर्कतेमुळे या बोटीचा सांगाडा नाल्या बाहेर काढण्यात आला. अरुण कांबळे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

Exit mobile version