रेवदंड्यातील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात

| रेवदंडा | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा आयोजित कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत अनेक आखाड्यांनी सहभाग नोंदविला असून, रंगतदार कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्तीप्रेमी मंडळीने केली आहे.

प्रतिवर्षी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रेवदंडा हायस्कूलच्या पटांगणात पारंपरिक कुस्ती स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडाच्या वतीने करण्यात येते. रेवदंड्यातील या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंनी यापूर्वी सहभाग नोंदविला असल्याने या पारंपरिक कुस्ती स्पर्धा नावलौकिकास आहे. ही कुस्ती स्पर्धा नारळावर घेण्यात येत असून, अनेक आखड्यांतील मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.

या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तत्पूर्वी, हनुमान प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून व श्रीफळ वाढवून पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी शेकापक्षाचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदीप घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री छत्रपती शिवाजी मंडळ चौल-रेवदंडा अध्यक्ष सुरेश खोत, खजिनदार शरद वरसोलकर, चिटणीस हेमंत गणपत, सदस्य मधुकर फुंडे, महेश ठाकूर, सुभाष शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचलन राजेंद्र नाईक यांनी केले.

या स्पर्धेत पंचाचे काम वासुदेव पाटील- आंदोशी, रवींद्र घासे- नवगाव, प्रमोद भगत- आवास, सुधाकर पाटील- आंदोशी व वैभव मुकादम- बेलोशी हे पाहात आहेत. स्पर्धेसाठी खलिल तांडेल यांच्याकडून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास चषक बक्षीस ठेवण्यात आली आहेत.

Exit mobile version