खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली डीपी रस्त्यावर असलेल्या सेवेन विलाज हॉटेलच्यासमोर नदीमध्ये एका महिलेने पाण्यात उडी मारली होती.या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शिने तिला वाचवण्याचे कसोशीने प्रयत्न केले. विशाल चव्हाण यांनी बेधडक पाण्यात स्वतःला झोकून देत सदर महिलेचे प्राण वाचवले. काशी हिलम – 54, रा. चिंचवली – शेकीन. खोपोली असे या महिलेचे नाव आहे.
यावेळी निलेश कुदळे, विवेक रावळ हनीफ कर्जीकर, मेहबूब जमादार,
रामकुमार निषाद आणि त्यांचे कामगार, पोलीस कर्मचारी विकास पाटील, अंकुश मोरे, मोहन केदार, विशाल पवार, अमोल ठकेकर
यांनी त्या आदिवासी महिलेला वाचविण्यासाठी यशस्वी शिकस्त केली.