उंदीर मारण्याचे औषध खाल्याने युवक दगावला

| रसायनी | वार्ताहर |

उंदीर मारण्यासाठी आणलेले औषध चुकून खाल्ले गेल्याने गणेश नगर मधील एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. गणेशनगर रिस येथील कस्तूर बिल्डींगमध्ये राहणारा जिक्सन जर्वासीस (वय 29) याच्या घरात उंदीर भरपूर झाले होते. त्यांनाा मारण्यासाठी जिक्सनने रेटॉल पेस्ट क्रीम आणली होती. त्याने सदर विषारी औषध टॉमेटोवर लावून सदर टोमॅटो घरात दोन तीन ठिकाणी ठेवून दिले नंतर हात न धुताच त्याने जेवण केले. हात न धुतल्याने हाताला लागलेले विषारी औषध जिक्सनच्या पोटात गेले. त्यामुळे जिक्सनला अस्वस्थ वाटून उलटया होवू लागल्या. त्याला ताबडतोब नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याला मयत घोषित केले.

Exit mobile version