युवक बेपत्ता

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी गवळी तिठा परीसरातील एका केशकर्तनालयात काम करणारा युवक 19 सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. अनुप राजदेव ठाकूर (29), असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ शैलेंद्र ठाकूर यांनी पोलिसात दिली असून येथील पोलीस ठाण्यात युवकाच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिकच्या माहितीनुसार, संबंधित युवक केशकर्तनालयात कामाला होता. तो 19 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास चहा प्यायला जातो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. मात्र उशिरापर्यंत परतला नाही. त्यामुळे त्याचा नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो कोठेही आढळून न आल्याने याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात भावाने तो बेपत्ता असल्याची खबर दिली.

Exit mobile version