काळभैरव मंदिरात चोरी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील करंजाडे येथील काळभैरव मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी करून मंदिरात असलेल्या दोन दानपेट्यांमधील रोख रक्कम व परिसरातील सहा सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना घडली आहे.

करंजाडे येथील से. आर – 3 , प्लॉट नं . 34 येथे असलेल्या काळभैरव मंदिराच्या मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून आत प्रवेश करून मंदिरात असलेल्या दोन दानपेट्यामधील रोख रक्कम व परिसरातील 6 सीसी टीव्ही कॅमेरे चोरून नेले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version