लक्ष्मी ऑरगॅनिक्स कारखान्यात चोरी

| महाड | प्रतिनिधी |

महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक्स लिमिटेड, युनिट 4 या कारखान्यांमध्ये शनिवारी (दि.15) दुपारी चार वाजता चोरीची घटना घडली. यामध्ये लोखंडी पाईप त्याचप्रमाणे अल्युमिनियमचे दरवाजे आणि तत्सम अन्य साहित्य असा एकूण 63 हजार रुपये किमतीच्या मालाचा समावेश होता. महाड औद्योगिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये शत्रुघ्न रामनारायण निसाद वय 26, अमितकुमार राजकुमार चौधरी वय 21, रुदल दौलत यादव वय 26, लालाभाई रामसनेही सिंग वय 44 या चार मुळ उत्तरप्रदेशच्या परप्रांतियांना अटक केली आहे. सध्या ते देशमुख कांबळे महाड येथे वास्तव्यास होते. त्यांच्याकडून सर्वच्यासर्व सुमारे 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर भा. द.वि. कलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार व्ही.एस.काळगिरे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version