कारची काच फोडून चोरी

| पनवेल | वार्ताहर |

गाडीतील बॅग आणि बॅगेतील अडीच लाख रुपये चोरल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परेश रामजी शहा हे नेरूळ येथे राहत असून त्यांचा होलसेल टाईल्स सप्लायरचा व्यवसाय आहे. त्यांनी अडीच लाख रुपये बॅगेत ठेवले होते. ते ओरियन मॉल पनवेल येथे काम असल्याने त्यांनी पैसे त्यांच्या कारमध्ये मागील सीटवर ठेवली आणि कार वडाळा तलावाकडून नाडकर्णी हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्माणधीन इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर पार्क केली. काम संपवून ते कारकडे गेले असता पाठीमागील काच तुटलेली दिसली. त्यावेळी त्यांना बॅग दिसली नाही व बॅगेतील रक्कम देखील चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना आढळले.

Exit mobile version