मोबाईल दुकानात चोरी

| पनवेल | वृतसंस्था |

मोबाइल दुकानाच्या गल्ल्यातील साडेतेरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी प्रथम जाधव आणि साहिल धोत्रे यांच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश देसाई हे भावना मोबाइल शॉप, साईबाबा मंदिराजवळ, पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी काम करतात. ते ग्राहकांना मोबाइल दाखवण्याचे काम करत असताना प्रथम जाधव व साहिल धोत्रे यांनी मोबाइलमधील त्यांचा फोटो दाखवून हा तुझाच फोटो आहे का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी माझा फोटो आहे असे सांगितले असता साहिल यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. आणि खुर्ची उचलून डोक्यावर, हातावर मारहाण केली. त्यानंतर प्रथम याने प्लास्टिकच्या स्टूलने त्यांना मारहाण केली. यावेळी साहिल याने जोराने लाथ मारून दुकानाच्या गल्ल्यातून साडेतेरा हजार रुपये जबरदस्तने काढून ते घेऊन गेले, याप्रकरणी पनवेल शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version