। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील हनुमान मंदिराजवळील घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली असून याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरातील दरवाजाचा कुलूप तोडून चोरटा घरात घूसला. बॅग आणि जॅकेट तसेच पॅन्टच्या खिशात ठेवलेली 72 हजार 520 रुपयांची रोकड त्याने लंपास केली. पोलीस निरीक्षक किशोेर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयुरी जाधव अधिक तपास करीत आहेत.







