अलिबागेतील वैभव वाईन शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडले

| अलिबाग | वार्ताहर |

पीएनपी नाटयगृह समोरील बायपास रोड येथील बियर व वाईन शॉप दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील 40 हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.

वाईन शॉप मालक वैभव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार
दि. 1 व 2 डिसेंबर दरम्यान त्यांच्या पीएनपी नाटयगृह समोरील बायपास रोड येथे असलेल्या वैभव बियर व वाईन शॉप दुकानाच्या छताला असलेला पत्रा उचकटुन काढुन त्याखालील सिलिंग तोडुन त्यावाटे आत प्रवेश केला. काउंटरचे दोन गल्ल्यामध्ये असलेली रोख रक्कम 40 हजार रूपये चोरून नेले. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. फौजदार. राजेंद्र सोनकर हे करीत आहेत.

Exit mobile version