| खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील कोरेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे दोन हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप दिनांक 19 रोजी काही ग्रामस्थांना तुटलेला दिसले. त्यावेळी मंदिरातील दानपेटी देखील दिसून आली आहे. शोध घेतला असता गावातील शाळेमध्ये दानपेटी पडलेल्या अवस्थेत दिसली. याप्रकरणी ग्रामस्थांनी खेड पोलिसांना माहिती दिली अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.