गोडावूनमधून 1 हजार किलो साखरेची नोकराकडून चोरी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

वरसोलीतील व्यापाऱ्याच्या वेशवी येथील गोडावून मधून नोकराने 1 हजार किलो साखरेची चोरी केल्याची तक्रार व्यापाऱ्याने अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे.
07 डिसेंबर 2021 ते 03 जानेवारी 2022 रोजी 10:00 च्या दरम्यान मौजे वेश्वी येथील गोडाउन येथे फिर्यादी रा.ओमकार फ्रेंड सर्कल, वरसोली ता.अलिबाग यांचे गोडाउन मध्ये पगारी काम करणारा नोकर रा.सागाव, ता.अलिबाग याने फिर्यादी यांचे अलिबाग येथील गोडाउन मधील एकूण 1000 किलो वजनाची साखर प्रत्येकी 30 रुपये प्रतिकिलो प्रमाणे एकूण 30,000/-रुपये किंमतीची साखर फिर्यादी यांचे संमत्ती शिवाय, लबाडीच्या हेतूने, स्वत:च्या फायदयासाठी चोरी केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एस.एस.शेलार हे करीत आहेत.

Exit mobile version