मोटारसायकलची चोरी

। पनवेल । प्रतिनीधी ।

पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील अधिकृत वाहनतळामधून वाहन चोरीला गेल्याची घटना खान्देश्‍वर रेल्वे स्टेशनबाहेरील वाहनतळामध्ये घडली आहे. त्यामुळे वाहनमालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कामोठेमध्ये राहणारे परशुराम राठोड यांनी त्यांची रॉयल इन्फिल्ड मोटरसायकल एमएच 03 एसी 3981 खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन बाहेरील वाहनतळावर उभी केली होती. घरी परत जाताना वाहनतळावर गेल्यानंतर मोटरसायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही न सापडल्यामुळे त्यांनी खान्देश्‍वर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version