। पनवेल । वार्ताहर ।
खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस शोध घेत आहेत.
खारघर सेक्टर 23 येथे राहत असलेले उमाशंकर लाल हे केंद्रीय वस्तू व सेवा कर व केंद्रीय उत्पाद शुल्क या विभागात काम करीत होते. सध्या उमाशंकर हे सेवानिवृत्त झालेले आहेत. उमाशंकर हे वैयक्तिक कामासाठी रेल्वेने बोरिवली येथे गेले होते. यावेळी त्यांनी आपली ॲक्टिव्हा कंपनीची दुचाकी खारघर रेल्वे स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत पार्किंग करून ठेवली होती. काम उरकून पुन्हा पार्क केलेल्या दुचाकीजवळ आले असता त्यांना त्यांची दुचाकी सापडली नाही. आपल्या दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात येताच उमाशंकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.






